कोरेगाव-भीमा प्रकरणात फडणवीसांचा खळबळजनक दावा

0

पुणे । राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक खुलासा करत कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून कारागृहात असलेला संशयित आरोपी रोना विल्सन याचे कारनामे पुन्हा एकदा उघड केले आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ कंपनी आर्सेनल कन्सल्टिंगने विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये घातक सॉफ्टवेअरचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर असलेली कागदपत्रे पेरण्यात आल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारच्या तपास संस्थांनी हा दावा नाकारला आहे. या अहवालाबाबत फडणवीस म्हणाले की, ‘हा अहवाल वाचला असून, त्याच्या पहिल्या परिच्छेदातच या कामासाठी रोना विल्सनने नेमणूक केली आहे,’ असे म्हटले आहे. स्वत: आरोपीने या खासगी कंपनीला नेमले आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल केंद्राच्या तपास यंत्रणेने नाकारला आहे,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रोनाची बाजू सावरून धरणारा अमेरिकन कंपनीचा कथित अहवाल विल्सन यांचे वकील सुदीप पासबोला यांनी बुधवारी मुंबईत हायकोर्टात सादर केला. त्या आधारे विल्सन यांच्यावरील आरोप रद्द करण्यात यावेत, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती वकिलांनी कोर्टाला केली आहे.

Copy