Deputy Superintendent of Police Somnath Waghchuure गणेशोत्सवात निर्बंध नसलेतरी डीजे परवानगी नाहीच

Deputy Superintendent of Police Somnath Waghchure : Ganeshotsav Mandal Office-Bearers Meeting at Bhusawal भुसावळ : यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त असलातरी यंदा सुध्दा गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीला डीजेला परवानगी मिळणार नाही. सर्व मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी अधिक उंचीच्या मूर्तीची ऑर्डर देऊ नये शिवाय वीज वाहक तारांना या मूर्तिचा स्पर्श होवून दुर्घटनेची भीती असल्याने आपणच आपली आचारसंहिता ठरवून घ्यावी, जेणे करून आपल्या शहरातील मंडळ आदर्श ठरेल. एक खिडकी योजनेतून परवानगी दिली जाणार आहे, वीज कंपनी, पालिका व पोलिस तिन्ही विभागांचे कर्मचारी तेथे असतील, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे बुधवारी शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पोलिस प्रशासनातर्फे दुपारी 12 वाजता शहरातील प्रभाकर हॉलमध्ये झाली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रावार, पोलिस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, निरीक्षक विलास शेंडे, शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक, वीज कंपनीचे अधिकारी धांडे, पदमे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रवींद्र सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी प्रास्तावित केले.

खड्डेमय रस्त्यातून द्यावी मुक्ती
शहरातील समस्या मार्गी लावाव्यात, पोलिसांच्यासूचनांचे पालन केले जाईल, असे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ म्हणाले तर गणेश मंडळांसाठी विजेची परवानगी ही वीज कंपनीने तात्काळ द्यावी, मंडळाच्या पदाधिकार्‍यांना फिरवा-फिरव करू नये, भुसावळात सुध्दा रात्री बारापर्यत परवानगी मिळावी, यंदा मुर्तीला निर्बंध नाही, त्यामुळे पोलिस प्रशासनाने सुध्दा सहकार्य करावे, अशी मागणी शिवसेनेचे बबलू बर्‍हाटे यांनी केली. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या मुर्ती मिरवणुकीत येत असल्यातरी वीजपुरवठा बंदमुळे गैरसोय होते ही बाब लक्षात पालिकेने जनरेटरच्या सहाय्याने मरीमाता मंदीर ते भुसावळ मेडीकलपर्यत हॅलोजन लाईट लावून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी गारखेड्याला नेतांना अडचण येत असल्याचे बैठकीत पदाधिकार्‍यांनी सांगितले. रस्त्यांवरील खड्डे बुजवून गणेश भक्तांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

वाहतूक मार्ग अडवू नये : खड्डे बुजवणार
गणेशोत्सवापूर्वीच शहरातील खड्डे बुजवण्यात येतील शिवाय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या मार्गावर वाहनांना जाण्यासाठी जागा सोडून मंडप टाकावे, चांगले देखावे सादर करावे, मंडळांना काही समस्या असल्यास त्या मंडळांनी पालिकेला पत्र दिल्यास समस्या दूर केल्या जातील, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले.