आजम खान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

0

नवी दिल्ली: आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाच्या वेळी सपाचे खासदार आजम खान यांनी भाजपाच्या खासदार ( तालिका अध्यक्षा ) राम देवी यांना उद्देशून माझे मन असे करते की, सतत आपल्या डोळ्यात पाहत राहावे. या वक्तव्यावरून लोकसभेत गोंधळ उडाला होता. राष्ट्रीय महिला आयोगाने आजम खान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजपा खासदारांनी आजम खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा शर्मा यांना जाहीर केले की, ही लज्जास्पद टीका आहे. लोकसभेचे सभापती यांनी आजम खान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच आजम खान यांना अयोग्य घोषित करण्याची मागणी केली आहे.

Copy