आज दुपारपर्यंत दिल्लीवरील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न-अरविंद केजरीवाल

0

नवी दिल्ली-दिल्लीत मोठ्या प्रमाणात जलसंकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत ट्वीट करून आज दिल्ली सरकार हरियाणा सरकारच्या संपर्कात असून आज दुपार पर्यंत दिल्लीवरील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे आश्वासन दिले आहे.

हरियाणामधील शाळा आणि रुग्णालयाच्या प्रश्नावरून त्यांनी भाजप सरकारवर निशाना साधला आहे. १४ हजार कोटींच्या बजेट असतांना देखील हरियाणामधील शाळा आणि रुग्णालयाची स्थिती सुधारली नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि शिक्षा मंत्री रामविलास शर्मा यांच्यावर आरोप केले.