कृषी कायद्याविरोधात कॉंग्रेस आक्रमक: प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला देशातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. मागील महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने अद्याप यावर तोडगा काढलेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. दरम्यान कॉंग्रेसही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. आज गुरुवारी दिल्लीत कॉंग्रेसचे आंदोलन आहे. आंदोलनात कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी सहभागी झाल्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलेच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.