आज आयपीएलचा DC vs KING XI PANJAB दुसरा थरार

0

दुबई: १३ व्या आयपीएलच्या मोसमाला कालपासून सुरुवात झाली आहे. यंदा कोरोनामुळे आयपीएलचा थरार भारतात होत नाहीये, युएसईमध्ये यंदाचे मोसम रंगणार आहे. काल शनिवारी १९ रोजी सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई संघात झाला. अतिशय रोमहर्षक अशा या सामन्यात चेन्नईने मुंबईवर मात ५ गडी राखून मात करत सलामीचा विजय नावावर केले. त्यानंतर आज रविवारी २० रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग XI पंजाबमध्ये दुसरा थरार रंगणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. दिल्ली संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे तर पंजाब संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे आहे.

असे आहे संघ
दिल्ली संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शिखर धवन, शिमरॉन हेटमीयर, मार्कस स्टोईनिस, अंबर पटेल, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, हर्षल पटेल, मोहित शर्मा , अ‍ॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, rरिच नॉर्टजे, डॅनियल सॅम, ललित यादव, कीमो पॉल

पंजाब संघ: लोकेश राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हूडा, मनदीप सिंग, जेम्स नीशम, जगदेवेश सुचित, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, मुरुगन अश्विन, कृष्णाप्पा गौथम , शेल्डन कोटरेल, हार्दस विल्जॉइन, ईशान पोरेल, सरफराज खान, तजिंदर सिंह, दर्शन नलकंडे, अर्शदीप सिंग, सिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, रवी बिश्नोई

काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या पहिल्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. शेवटपर्यंत विजय कोणाचा होईल? हे सांगणे कठीण झाले होते. मुंबईने १६३ धावांचे लक्ष दिले होते, हे लक्ष १९.२ षटकात चेन्नईने पूर्ण केले. अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKचा डाव सावरला. त्यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने बाजी मारली.

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी’कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. मात्र पीयूष चावलाने गुगली टाकत रोहितची विकेट घेतली. यंदाचे मोसमातील पहिला विकेट घेण्याचा मान पियुष चावलाला मिळाला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या.

Copy