चेन्नईचा नवा विक्रम; आजपर्यंत कोणत्याही संघाला जमली नाही ‘ही’ कामगिरी

0

दुबई: सध्या आयपीएलचे १३ वे हंगाम सुरु आहे. दुबईत सामने खेळविले जात आहे. कोरोनामुळे स्टेडियममध्ये बसून सामने बघण्याचा आनंद यावर्षी नाही पण चाहते मात्र जोरात आहेत. दरम्यान काल मंगळवारी चेन्नई विरुद्ध हैद्राबाद संघाचा सामना झाला. यात चेन्नईने विजय मिळवीत प्रभावाची मालिका खंडित केली. यावर्षी चेन्नई संघ नावाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतांना दिसत आहे. ८ पैकी ३ च सामन्यात विजय मिळविण्यात चेन्नई संघाला यश आले आहे. ५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. कालच्या विजयाने चेन्नई ८ पैकी ३ विजयांसह गुणतक्त्यात सहाव्या पोहोचला आहे. चेन्नईने हैदराबादचा २० धावांनी पराभव केला आणि आयपीएलमध्ये एक विक्रम स्वत:च्या नावावर केला.

चेन्नईने हैदराबादवर मिळवलेला हा १०वा विजय ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज असा पहिला संघ आहे ज्याने सर्व संघाविरुद्ध १० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवलाय. अन्य कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही. हैदराबादसह चेन्नईने सर्व संघांविरुद्ध १० पेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. दिल्ली आणि बेंगळुरू विरुद्ध त्यांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १५ वेळा विजय मिळवला आहे. तर राजस्थानविरुद्ध १४, पंजाब आणि कोलकाता विरुद्ध प्रत्येकी १३ वेळा विजय मिळवला आहे. आयपीएलचे सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई विरुद्ध चेन्नईने १२ वेळा विजय मिळवला आहे.

चेन्नईचे विजय
दिल्ली- १५ वेळा
बेंगळुरू- १५ वेळा
राजस्थान- १४ वेळा
पंजाब- १३ वेळा
कोलकाता- १३ वेळा
मुंबई- १२ वेळा
हैदराबाद- १० वेळा

Copy