ज्येष्ठांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत

0

नवी दिल्ली । देशात सुरू असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 1 मार्चपासून ज्येष्ठांना लस दिली जाणार असून, त्याचा खर्च हा केंद्र सरकार करणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

जावडेकर म्हणाले की, 1 मार्चपासून 60 पेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ आणि इतर व्याधी असणारे 45 हून अधिक वय असणारे नागरिक यांचे लसीकरण केले जाणार आहे. 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांवर हे लसीकरकण होईल. ही लस देण्याचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. पण ज्यांना खासगी रुग्णालयातून लस घ्याची आहे, त्यांना पैसे भरावे लागतील. ही रक्कम किती असेल याचा निर्णय लवकरच आरोग्य मंत्रालय घेईल, असेही जावडेकर म्हणाले. त्यासाठी अजून चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. रक्कम निश्‍चितीबाबत आरोग्य मंत्रालय, रुग्णालये व लस उत्पादक यांची चर्चा सध्या सुरू आहे.

केंद्राने महाराष्ट्रात पथक पाठवले
दरम्यान, अन्य एका वृत्तानुसार कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने तीन सदस्यीय पथके पाठवली आहे. महाराष्ट्रासह केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही पथके जाऊन कोरोनाशी लढण्यात मार्गदर्शन करणार आहे. या पथकाचे नेतृत्त्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव-स्तरीय अधिकारी करणार आहेत.

Copy