कोरोना : जळगाव जिल्ह्यात 408 नवीन रुग्णांची भर

एकट्या जळगाव शहरात 191 रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात रविवारी, कोरोनाच्या नवीन 408 रुग्णांची भर पडली असून, त्यातील सर्वाधिक 191 रुग्ण हे एकट्या जळगाव शहरात आहेत. त्यामुळे ही आकडेवारी सर्वांची चिंता वाढवणारी ठरली आहे. दिवसभरात जळगाव शहरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत एकूण 60878 रूग्ण आढळून आले असून, त्यापैकी 56,988 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
इतर तालुक्यांमधील रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. जळगाव ग्रामीण 4, भुसावळ 21, अमळनेर 20, चोपडा 53, पाचोरा 13, भडगाव 5, धरणगाव 9, यावल 2, एरंडोल 3, जामनेर 33, रावेर 7, पारोळा 12, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 18, इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 408 रूग्ण आढळून आले.

 

Copy