BIG NEWS: भारतात दोन लसींच्या वापराला परवानगी

0

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे लस. संपूर्ण जगात लसीच्या निर्मितीवर काम सुरु आहे. दरम्यान भारतातही स्वदेशी निमितीची लस तयार करण्यात आली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण भारतीयांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असे डीसीजीआयने स्पष्ट केले आहे.

काल शनिवारी भारतात ड्राय रनही पार पडला. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महामारी विरोधातील आलेले यश असल्याचे त्यानी म्हटले आहे.

 

Copy