COVAXIN 15 ऑगस्टला दाखल होणार?

0

नवी दिल्ली:देशात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनावर कोणतेही ठोस उपचार पद्धत अद्याप विकसित झालेली नसल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. दरम्यान संपूर्ण भारतीय बनावटीच्या भारत बायोटेक कंपनीने COVAXIN ही लस तयार करण्यात आली असून ती 15 ऑगस्टला बाजारात दाखल होऊन तिचा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे ही लस लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकच्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीसाठी मान्यता देण्यात आली होती. आयसीएमआरकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार ७ जुलैपासून मानवी चाचणीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर १५ ऑगस्टपर्यंत ही लस लाँच करण्यात येईल. ते झाल्यास सर्वप्रथम भारत बायोटेकची COVAXIN ही लस करोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.

आयसीएमआरकडून सध्या याबाबत केवळ शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली होती. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळे करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं होतं.

Copy