निंदनीय; कोरोनामध्येही विक्रमी भ्रष्ट्राचार; फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज मंगळवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा सुरु आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग नोंदवीत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. देशात सर्वाधिक वाईट अवस्था महाराष्ट्राची आहे. सर्वात निंदनीय बाब म्हणजे कोरोना काळातही भ्रष्ट्राचार केला गेला. राज्य सरकारकडून विक्रमी कोविड सेंटर उभारल्या गेल्याचा दावा केला जातो आहे, मात्र या विक्रमी कोविड सेंटरमध्ये विक्रमी भ्रष्ट्राचार झाला आहे. कोण-कोणत्या गोष्टीत भ्रष्ट्राचार झाला याचा पाढाच फडणवीस आणि वाचून दाखवला.

कोविड सेंटरमध्ये विक्रमी भ्रष्ट्राचार झाला आहे. आम्ही कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची पुस्तिकाच तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही ते भेट देणार आहोत असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना मृत्यूदर हा देशातील सर्वात जास्त आहे. मात्र राज्य सरकारने मृत्यू दर रोखण्यासाठी काम केले नाही, राज्य सरकारने नीट काम केले असते तर राज्यातील ३ हजार ९०० मृत्यू वाचवू शकलो असतो, असा एक अहवाल सांगतो असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Copy