बाप रे ! चौथ्या दिवशीही कोरोना रूग्णसंख्या शंभरी पार

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात २६१ रूग्ण आढळुन आले होते. आज चौथ्या दिवशीही जिल्ह्यात नव्याने १६९ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले आहे. यात सर्वाधिक जळगाव शहरात ८४ रूग्ण आढळुन आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. जिल्हावासियांच्यादृष्टीने ही चिंताजनक बाब मानली जात आहे. आज नव्याने १६९ रूग्ण आढळुन आले आहेत. त्यात जळगाव शहर ८४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ १२, अमळनेर ५, चोपडा ४, पाचोरा १, धरणगाव ५, यावल १, जामनेर ६, रावेर ३, पारोळा ७, चाळीसगाव २३, मुक्ताईनगर १०, इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १६९ रूग्णांची नव्याने भर पडली आहे. आत्तापर्यंत रूग्णसंख्या ५८०२१ इतकी झाली असुन त्यापैकी ५५९८५ इतके रूग्ण बरे झाले आहे.

Copy