CORONA: राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0

मुंबई: कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ४० च्या जवळपास पोहोचली आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण विभागाखाली येणाऱ्या राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी जाहीर केला आहे. परीक्षा कधी घेण्यात याव्यात याबाबत २७-२८ मार्चला आढावा घेण्यात येणार असल्याचेही मंत्री सावंत यांनी सांगितले.

२५ मार्चपर्यंत राज्यातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होम (घरून काम)चे आदेश देण्यात आले आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1239533131884974080
Copy