कॉंग्रेसचे संकटमोचक अडचणीत; डीके शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयची धाड

0

बंगळुरू: कर्नाटक कॉंग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्या आणि त्यांचे बंधु डीके सुरेश यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. आज सोमवारी ५ ऑक्टोंबर रोजी सकाळीच सीबीआयचे अधिकारी शिवकुमार यांच्या बंगळुरूस्थित घरी पोहोचले आहेत. पथकाकडून चौकशी सुरु आहे. काँग्रेसने मात्र भाजप सरकारकडून हेतुपुरस्सर विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरु असल्याचे म्हणत सीबीआयच्या या छापेमारीचा निषेध केला आह्हे. सीबीआयला भाजपाच्या हातातील बाहुली असल्याचे आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आले. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटर करुन, मोदी आणि येदीयुरप्पा सरकारकडून काँग्रेसला भीती दाखविण्याचा प्रयत्न सीबीआयद्वारे करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने येडीयुरप्पा सरकारच्या भ्रष्टाचाराचा तपास करावा असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

सीबीआयने डीके शिवकुमार आणि त्यांचे बंधु सुरेश यांच्याशी संबंधीत 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, बंगळुरु येथील जुने निवास्थान डोड्डालहल्ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. याप्रकरणी काँग्रेसने नाराजी व्यक्त करत, मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.