अखेर मोदी मंत्रिमंडळाचा खातेवाटप निश्चित; अमित शहा गृहमंत्री तर सितारमण अर्थमंत्री !

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच देण्यात आले आहे. शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले असून रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ वाटप
अमित शहा – गृहमंत्री
नितीन गडकरी – दळणवळण
निर्मला सीतारमन – अर्थमंत्री
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
नरेंद्र सिंग तोमर – कृषीमंत्री
पीयुष गोयल – रेल्वे मंत्री
स्मृती इराणी – महिला बालकल्याण मंत्री
प्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि माहिती प्रसारण
रविशंकर प्रसाद- कायदा आणि न्यायमंत्री
अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक मंत्री
हरसिम्रत कौर-अन्न प्रक्रिया मंत्री
अर्जुन मुंडा आदिवासी विकास मंत्री
गिरीराजसिंग-पशुसंवर्धन मंत्री
प्रल्हाद जोशी-संसदीय कामकाज मंत्री
महेंद्रनाथ पांडे-मनुष्बळ आणि उद्योग विकास मंत्री
संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री

Copy