चोपडा मतदारसंघाचा गड शिवसेनेने राखला

0

विलास पाटील

चोपडा: चोपडा विधानसभा मतदारसंघातुन विधानसभेवर आठ आमदार तालुक्यातुन निवडून गेले. मात्र तालुक्याच्या विकास करण्यास आठही आमदार अकार्यक्षम ठरले. 13व्या विधानसभा निवडणूकीत प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विजय संपादन केला होता. त्यांनी पाच वर्षाच्या कालखंडात भरघोस निधी आणुन तालुक्याच्या विकास केला. याचा फायदा माजी आमदार प्रा.सोनवणे यांच्या पत्नी शिवसेनेचा उमेदवार लता सोनवणे यांना मतदारांनी विकासाला प्राधान्य देऊन ते मतदान शिवसेनेच्या पारड्यात टाकले. त्यामुळे शिवसेनेने आपला गड कायम राखला. भाजपाच्या बंडखोरीचा याठिकाणी कुठलाही परिणाम झाला नाही. चोपडा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत बारेला व भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर सोनवणे या दोन्ही उमेदवारांचा दोन्ही उमेदवारांनी चांगली मते घेऊन लढत दिली. डॉ.बारेला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जायंटलकिलर ठरले. जळगाव घरकुल घोटाळ्यात अडकलेले चंद्रकांत सोनवणे यांनी पत्नी लताबाई सोनवणे यांच्यासाठी एकहाती खिंड लढविली. माजी आमदार कैलास बापु पाटील यांचा गट भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्या पाठीशी होता. परंतु भाजपाचे पदाधिकारी व कैलास पाटील यांच्या गटाच्या अपेक्षित असा फायदा झाला नाही. भाजपा पेक्षा शिवसेनेची ताकद जास्त असल्याचे या निवडणूकीचा माध्यमातून दिसुन आली. जगदीश वळवी यांना (57608), प्रभाकर सोनवणे यांना (32459), तर डाँ चंद्रकांत बारेला (17085) असे एकुण मतांची बेरीज केल्यास शिवसेनेच्या मताधिक्यापेक्षा जास्त आकडेवारी आहे. दोघेही अपक्ष उमेदवार यांना मिळालेले मतांपैकी निम्मे मते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. कैलास पाटील यांचा गट तटस्थ भुमिकेत राहिला असता तर या गटाच्या फायदा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जगदिश वळवी यांना तारक ठरणार होती. विकासाच्या बळावर मतदारांनी तालुक्यात आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे यांना विजयरथापर्यंत पोहचवले व शिवसेनेच्या गड कायम राखला.

Copy