अशोक चव्हाणांसाठी निलेश नारायण राणेंचा चिवडा

0

काँग्रेसचे माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी चिवड्याची भेट पाठवली आहे. मात्र थेट भेटून ती देण्याइतपत दोघांचे नाते प्रेमाचे नसल्याने त्यांनी त्यासाठी ट्विटरचं माध्यम वापरले आहे. अशोकरावांना उद्देशून त्यांनी मस्त कोकणी खवचटपणे एक संदेशही टिवटिवला आहे. ते म्हणालेत, “अशोक चव्हाण, चिवडा पाठवला आहे. पदं तर तुम्ही वाटू शकत नाही, किमान चिवडा वाटप करा!”

एकीकडे नारायणराव राणे दिल्लीला रवाना झाले असताना दुसरीकडे त्यांच्या सुपुत्राने केलेले हे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये इतर कोणतीही ओळख न देता फक्त “जय महाराष्ट्र” एवढाच बदल केला आहे. तो जय महाराष्ट्र कोणत्या पक्षाला अखेरचा आणि कोणत्या प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाला शुभारंभाचा ते लवकरच स्पष्ट होईल, असेही म्हटले जाते.