Breaking : चाईल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी सीबीआयचे जळगाव धुळे जिल्ह्यात छापे

जळगाव – ऑनलाइन बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. छापेमारीत जळगाव धुळे जिल्हा च देखील समावेश आहे.

देशातील 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 70 ठिकाणी छापे टाकून 83 आरोपींविरुद्ध 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील आरोपींचे धागेदोरे हे शंभर देशांची जुळले असल्याची शक्यता आहे चौकशीत आतापर्यंत 50 हून अधिक ग्रुप आढळून आले आहेत.

 

सीबीआयने केलेल्या छापेमारीच्या कारवायांमुळे जळगाव धुळे जिल्हा पुन्हा रडारवर आला आहे. यावेळी माऊ, चांदवली, वाराणसी ,गाजीपुर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, गाजियाबाद, मुजफ्फरनगर, जुनागड, भावनगर, जामनगर, संगरुर, मलेरकोटला, पतियाळा, पटणा, पानिपत, ओडीसा, राजस्थान, पालघर याठिकाणी छापेमारी करण्यात आली.

Copy