VIDEO: #CABवरून जळगाव मनपात गदारोळ; शिवसेना नगरसेवकाने राजदंड पळविला !

0

जळगाव: नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देशात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. आज देशभरात बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान जळगाव महानगर पालिकेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद उमटले. शिवसेना नगरसेवकाने राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार झटापट झाली. यात भाजप नगरसेवकांनी पुन्हा राजदंड महापौरासमोर जाऊन ठेवले. महापालिकेच्या सभेत हा प्रकार घडला. शिवसेना नगरसेवक इबा पटेल यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली.

Copy