BREAKING: शेतकऱ्यांना २५ हजाराची मदत द्या; विधानसभेत भाजप-सेना आमदारांमध्ये खडाजंगी !

0

मुंबई: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु आहे. आज मंगळवार अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. पहिल्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून आक्रमक भूमिका घेतली होती. आज दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले आहे. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी देखील झाली. मंत्री जयंत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून आमदारांना शांत केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ५७ अन्वये नोटीस दिली व चर्चेची मागणी केली. मात्र भाजप आमदारांनी प्रचंड गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज अर्धा तास स्थगित करण्यात आले. याभाजप आमदारांनी सभागृहात सामना वृत्तपत्रात असलेल्या बातमीचे बॅनर फडकविले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी बॅनर फडकविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. बॅनर फडकविणाऱ्या आमदारांचे नावे लिहा असे देखील अध्यक्षांनी सांगितले.

Copy