BREAKING: राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड !

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ५४ जागांवर विजय मिळाला असल्याने सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असणार आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेते पदाच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांची विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त नेतेपदी निवड जाहीर केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

या बैठकीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची देखील निवड होणार आहे.

Copy