BREAKING: श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण; मोदीही संपर्कात

0

अयोध्या: राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर उद्घाटन झाले. त्यावेळी व्यासपीठावर नृत्य गोपालदास महाराज उपस्थित होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्वारंटाईन व्हावे लागेल असे बोलले जात आहे. मोदींसोबत उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे चिंता वाढली आहे.

५ ऑगस्टला म्हणजे आठ दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यू गोपालदास महाराज यांना भेटले होते. मात्र ते त्यांचं संपर्कात किती वेळ होते? हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. उद्घाटनावेळी उपस्थित सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी कोणीही पॉझिटिव्ह नव्हते. मात्र आता अध्यक्षच पॉझिटिव्ह आले आहेत.

दोन दिवसानंतर स्वातंत्र्य दिन असून त्यासाठी मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून विविध कार्यक्रम देखील होणार आहे. मात्र आता मोदींचा पुढील कार्यक्रम कसा राहील? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.