BREAKING: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास नकार कायम

0

नवी दिल्ली: मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारसह अनेक संघटनांनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केलेली आहे. यावर आज बुधवारी ९ रोजी सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाजाला आणि राज्य सरकारला दिलासा मिळालेला नाही मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निराशा पदरी पडली आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास कोर्टाने नकार देत नोकरी भरतीला देखील स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान आता राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण टिकविण्यात अपयशी ठरले आहे. सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याने मराठा समाजाच्या पदरी निराशा आल्याचे आरोप करण्यात आले आहे.

Copy