BREAKING: भारतात 3 में पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ: मोदींची मोठी घोषणा

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला. दरम्यान 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसाच्या लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लॉकडाऊन आता में पर्यंत कायम राहणार आहे. तसेच 20 एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाच्या संख्येत घट झाल्यास त्या ठिकाणी हळूहळू आवश्यक बाबींना सूट देण्यात येईल असेही मोदींनी जाहीर केले. आर्थिकदृष्ट्या लॉकडाऊन महाग आहे परंतु जनतेसाठीहा निर्णय घ्यावा लागत आहे.

देशात कोरोनाच्या संख्येत वाढ होत असल्याने देशवासियांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचेही मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी देशवासियांना सात विशेष बाबी सांगितल्या. त्यात घराबाहेर न निघणे, घरातील वृद्धांची विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले. तसेच कोणत्याही खासगी संस्था तसेच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारताने वेळेवर निर्णय घेतल्याने संख्या कमी आहे. मात्र भारताची इतर देशाशी तुलना करणे योग्य नाही असेही मोदींनी यावेळी सांगितले.

Copy