शायरीचा कलंदर गेला; प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे निधन

0

नवी दिल्ली: प्रसिद्ध गझलकार (शायर) राहत इंदौरी यांचे आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आजच मंगळवारी ११ ऑगस्टला समोर आले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते.

आज सकाळीच त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: दिली होती. “कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” असे त्यांनी ट्वटिद्वारे सांगितले आहे.

‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर सोशल मीडियात प्रचंड गाजला. अबालवृद्धांपासून सगळेच या शेरच्या प्रेमात पडले होते. तरुणांनी तर अक्षरश: या शेरला डोक्यावर घेतले होते. त्यांच्या शायरीतून ते नेहमी राजकारणासह इतर विषयांवर भाष्य करत होते.

१ जानेवारी १९५० मध्ये त्यांचा जन्म झाला होता. उर्दू आणि हिंदी साहित्याचे ते मोठे अभ्यासक होते.

Copy