BREAKING: खडसेंच्या आरोपावर फडणवीसांचे उत्तर; मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काल त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशनावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आरोप केले. माझ्या विरोधात कटकारस्थान रचण्यामागे फडणवीस यांचा हात असल्याचे आरोप खडसे यांनी केले होते. फडणवीस यांनी सर्वांना क्लीनचीट दिली मात्र मला क्लीनचीट दिली नाही असे खडसेंनी सांगितले होते. दरम्यान यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ‘खडसे यांनी केलेले सर्व आरोप निरर्थक असून तपासातून अनेक बाबी उघड झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल आदर आहे, ते आमच्या परिवारातील असून त्यांची नाराजी चर्चा करून दूर करू’ असे फडणवीस यांनी सांगितले.

खडसे यांचा राजीनामा मनीष भंगाळे प्रकरणात घेतला नाही, एमआयडीसी प्रकरणात त्यांचा राजीनामा घेण्यात आला असे फडणवीस यांनी सांगितले.

‘माझ्याकडे खूप संयम आहे, मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही असे फडणवीस यांनी सांगत खडसे यांना टोला लगावला.

Copy