BREAKING: कमलनाथ सरकारकडे बहुमत नाही; दिग्विजय सिंहांची फ्लोर टेस्ट पूर्वीच कबुली

0

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपची साथ धरल्यानंतर मध्य प्रदेशमधील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया पाठोपाठ कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी एकगठ्ठा राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. सुप्रीम कोर्टाने आज कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असल्याने आजच विशेष अधिवेशन बोलावून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्यावी लागणार आहे. बहुमत चाचणीनंतर मध्यप्रदेशात कमलनाथ खुर्चीवर कायम राहणार की, शिवराज सिंह चौहान सरकार बनविणार करणार हे स्पष्ट होणार आहे. परंतू बहुमत चाचणीपूर्वीच काँग्रेसने माघार घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

मुख्यमंत्री कमलनाथ 12 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहे. दरम्यान राजीनामा दिलेल्या 22 पैकी 6 आमदारांचे राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी आधीच मंजूर केले होते. आता उर्वरित 16 आमदारांचे देखील राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मानले जातात. कमलनाथ सरकारला सध्या चार अपक्ष, दोन बसपा आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदारांचे समर्थन आहे. अशा प्रकारे कमलनाथ सरकारकडे 99 चे संख्याबळ आहे, मात्र बहुमत नाही.

Copy