बॉलिवूडमधील मंडळी घेत आहे ऋषी कपूरची भेट

0

न्युयोर्क-ऋषी कपूर सध्या आजारी असून उपचारासाठी अमेरिकेत आहेत. खुद्द ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. दरम्यान ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला असल्याच्या बातम्या मीडियात फिरत होत्या. पण या बातम्या केवळ अफवा असून अद्याप तरी त्यांच्या केवळ टेस्ट सुरू आहेत असे त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते.

ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते दोघे खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले मीटर आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. त्यावेळेचा एक व्हिडिओ देखील ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता.

आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते. सोनाली कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरिकेतच आहे. त्यांच्या या भेटीचा फोटो नीतू सिंग कपूर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

तसेच प्रियांका चोप्राने देखील नुकतीच ऋषी कपूर यांची भेट घेतली. ऋषी कपूर, नीतू आणि प्रियांका यांचा फोटो प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर करत तुम्हाला नेहमीप्रमाणे आनंदित पाहून खूप आनंद झाला असे लिहिले आहे.

Copy