भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा

0

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर उघडपणे टीका करणारे भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे आणि तशी शक्यता देखील आहे.

Copy