भाजप नेते मोदींना कोरोनाची लागण !

0

पाटणा: कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असतांनाच बिहार विधानसभा निवडणुकीचा धुरळा सुरु आहे. भाजप-जेडीयू एकत्र येत ही निवडणूक लढत आहे. संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. भाजपने या निवडणुकीत बहुमत मिळविण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. केंद्रीय पातळीवरील नेते बिहारमध्ये तळ ठोकून बसले आहे. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोदी यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. ‘कोरोनाचे लक्षणे दिसून आल्याने चाचणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली. प्रकृती बरी आहे पण खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणा येथील एम्समध्ये दाखल होत असून लवकरच निवडणुकीच्या प्रचारासाठी परतेल’ असे मोदी यांनी सांगितले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे महत्त्वाचे चेहरे आहेत. त्यांनी प्रचारासाठी उपलब्ध राहणे आवश्यक आहे.

Copy