भाजप वक्त्यांच्या यादीत कुमार सानू यांचे नाव; मी भाजपचा सदस्य देखील नाही-कुमार सानू

0

कोलकाता: भाजपतर्फे पश्चिम बंगाल राज्यात यामहिन्यात ‘रथ यात्रा’ निघणार आहे. यासाठी भाजपतर्फे नामांकित वक्त्याची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या नावाचा देखील समावेश आहे. दरम्यान आपल्या नावाचा समावेश भाजपच्या वक्त्याच्या यादीत कसे आले याबाबत कुमार सानू यांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. मी भाजपचा सदस्य देखील नाही असे स्पष्टीकरण कुमार सानू यांनी दिले आहे.

भाजपाच्या ‘रथ यात्रे’साठी वक्त्याची नावे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानंतर कुमार सानू यांचे नाव निश्चित झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.

Copy