bird flu : जळगावमध्येही चिंता; ग्राहक घटले

0

जळगाव – कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली असताना देशात आणखी एका धोकादायक आजाराचा फैलाव सुरू झाला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये आढळलेला बर्ड फ्लू (bird flu) आता हिमाचल आणि केरळमध्येही पसरला आहे. केरळमधील दोन जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, राज्य आपत्ती घोषित करण्यात आली आहे. बाधित पक्षी आढळून आलेला भाग आणि त्याच्या एक किमी परिघातील पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जळगावमध्येही चिकन विक्रेते धास्तावले आहेत.

जळगाव (jalgaon) जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे आणि याच राज्यात बर्ड फ्लू पसरत आहे. त्याचा थेट फटका जळगाव शहरातील कोंबडी विक्रेत्यांनाही बसू लागला आहे. चिकन विकत घेणार्‍या ग्राहकांची संख्या अचानक कमी झाली आहे, अशी माहिती चिकन विक्रेता सलीम शेख यांनी‘जनशक्ती’शी बोलताना दिली. बर्ड फ्लूच्या बातम्यांमुळे अंडी, चिकन खाणारे धास्तावले आहेत. परंतु, जळगाव शहरात होणारा चिकनचा पुरवठा हा मालेगावहून होतो. यामुळे सध्यातरी शहराला बर्ड फ्लूची चिंता करण्याची गरज नाही, असेही या विक्रेत्याचे म्हणणे आहे.

Copy