BIG BREAKING: रिया चक्रवर्तीला अटक

0

मुंबई: सुशांत राजपूत प्रकरणातील चर्चेत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे.

सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के के सिंह यांनी डॉ. सुजैन वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी डॉक्टरविरूद्ध मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे. सुजैन वॉकर हा सुशांतचा थेरपिस्ट होता. सुशांतच्या मानसिक आजारावर त्यांनी जबाब दिला आहे आणि अभिनेत्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचीही माहिती दिली होती. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रगच्या अॅगलने तपास सुरु आहे. यात रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावले ह्तोये. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली.

Copy