आयुक्तांच्या दालनाबाहेर पाण्यासाठी अंघोळ आंदोलन

धुळ्यात पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेनेचे आंदोलन

धुळे l शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. १५-१५वठा होत नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करुनही उपयोग होत नाही. उलट टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेनेने आयुक्त देविदास टेकाळे यांच्या दालनाबाहेर अंघोळ आंदोलन केले. यावेळी मनविसेच्या एका कार्यकत्यनि अंगावर बादलीने पाणी ओतून धुळेकरांना पाणी द्या, असा सूचक इशारा देवून मनपाच्या कारभाराचे पूर्ण वाभाडे काढले. यावेळी आयुक्त देविदास टेकाळे यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी मनविसेचे शहराध्यक्ष हर्षल परदेशी, गौरव गिते, शामक दादाभाई, भावेश गद्रे, आदित्य विरगावकर, राहुल बागुल, प्रशांत तनेजा, ऋषिकेश कानकाटे, गणेश जाधव, शुभम माळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून शहराच्या विविध भागात दहा ते बारा दिवस उलटूनही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्नही मनविसेने उपस्थित केला. मनपा ३६५ दिवसांची पाणीपट्टी पाणीपुरवठा होत नाही.

 

आकारते. मात्र, प्रत्यक्षात ५० दिवसही मग उर्वरित ३१५ दिवसांची पाणीपट्टी जनतेने का भरावी, असाही प्रश्न मनविसेने उपस्थित केला आहे.

नियोजनाअभावी उगारले

आंदोलनाचे अस्त्र पाणी समस्येसाठी महानगरपालिकेच्या | अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना संपर्क साधल्यावर ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. लाईट नसल्याचे कारण देत टाळाटाळ करतात. जर वीजेची समस्या आहे तर मग मनपा प्रशासन महावितरणसोबत चर्चा करणे अपेक्षित आहे. परंतु, धुळेकरांना नियमित पाणी मिळावे, यासाठी मनपा सत्ताधाऱ्यांचे कुठलेही ठोस नियोजन नाही. तशी तत्परता दाखविली जात नाही. म्हणूनच आंदोलनाचे अस्त्र उगारल्याची प्रतिक्रिया मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.