पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज !

0

दुबई – आशिया चषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघ आज पुन्हा एकदा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत, पाकिस्तानमध्ये आज ‘सुपर फोर’ सामना होत आहे.

या सामन्यात आत्मसंतुष्ट न राहता शानदार कामगिरी करण्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय टीमची असणार आहे. तीन सामन्यात तीन विजयांसह भारताला अंतिम सामन्याकडे वाटचाल करावयाची आहे.

दुसरीकडे अफगाणिस्तानवर केवळ तीन चेंडू शिल्लक असताना कसातरी विजय नोंदविणाऱ्या पाकला कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान असेल. तीन दिवसांआधी भारताने पाकला आठ गड्यांनी धुतले तरीही पुन्हा एकदा कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही, या इराद्यासह भारत खेळण्यास इच्छुक आहे.