‘जनशक्ती’च्या पत्रलेखकास गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान

0

मुंबई – दैनिक ‘जनशक्ती’चे पत्रलेखक व जॉन्सन अँड जॉन्सन प्रा. लि. मधील दत्तप्रसाद रामचंद्र शिरोडकर यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा राज्य गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

मुंबईत कामगारमंत्री माननीय दिलीप वळसे-पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार शिरोडकर यांना देण्यात आला. याप्रसंगी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, प्रशासकीय अधिकारी विनिता सिंघल व कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.