अमिताभ बच्चन, अक्षय कुमार खरे हिरो नाहीत

0

मुंबई । “मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरूद्ध नाही तर त्यांच्या कामाविरूद्ध बोललो. ते खरे नायक नाहीत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

पटोले म्हणतात, ते (अमिताभ बच्चन व अक्षय कुमार) खरे नायक असते तर दु:खाच्या वेळी लोकांच्या पाठीशी उभे राहिले असते. त्यांना ‘कागदी वाघ’ राहायचे असेल, तर आम्हाला काही अडचण नाही. जेव्हा जेव्हा या दोघांचे चित्रपट प्रदर्शित होतील तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही लोकशाही मार्गाने जाऊ. आम्ही ‘गोडसे वाले’ नसून ‘गांधी वाले’ आहोत, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. दरम्यान, नाना पटोले यांच्या भूमिकेनंतर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे.

 

https://twitter.com/ANI/status/1363095991054790659

Copy