मोठी बातमी: संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार

0

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे लस आहे. लसीच्या निर्मितीवर काम सुरु असून लवकरच लसीकरण सुरु होणार आहे. दरम्यान लसीकरणावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मोठे विधान केले आहे. संपूर्ण भारतीयांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविडशिल्ड लसीला केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच लस दिली जाणार आहे. मात्र लसीची किंमत मोठी असेल अशी समज होती, सर्वसामान्य नागरिकांना ती परवडेल का?याबाबत शंका होती. मात्र आता संपूर्ण भारतीयांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी जाहीर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना लसीच्या वितरणाची तयारी सुरु असून नियोजन झाल्यानंतर लसीकरण करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Copy