कंगना, आलिया वादात रणदीपची उडी; घेतली आलियाची बाजू !

0

नवी दिल्ली: सध्या बॉलीवूडमध्ये आलिया भट तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अभिनयामुळे ती चाहत्यांमध्ये अधिक चर्चेत असतांनाच ती कंगना राणौतच्या आरोपांमुळे अधिक चर्चेत आहे. लीकडे एका ऑनलाईन पोलमध्ये चाहत्यांनी अभिनयाच्या बाततीत आलियाला कंगनापेक्षा सरस म्हटले आणि कंगनाचा पारा चढला. ‘गली बॉय’मध्ये असे काय होते की, ती सरस ठरावी? तिच्याशी तुलना ही माझ्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. कृपया, सुमार काम करणा-यांना इतके डोक्यावर बसवू नका, असे कंगना म्हणाली होती. दरम्यान आता आलियाच्या बाजूने तिचा मित्र रणदीप हुड्डा याने कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे.

‘माझी सर्वाधिक प्रिय आलिया. मला आनंद वाटतो की, तू संधीसाधू कलाकारांच्या मतांना महत्त्व दिले नाहीस. शिवाय जुन्या ‘शिकारी’ कलाकारांच्या बोलण्याचा स्वत:च्या कामावर आणि स्वत:वर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. स्वत: सतत पुढे नेण्याच्या तुझ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा’, असे ट्वीट रणदीपने केले. आलिया व रणदीप हुड्डा या दोघांनी ‘हायवे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासून दोघांचीही चांगली मैत्री आहे.

Copy