उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोरोनावर मात; रुग्णालयातून डिस्चार्ज

0

मुंबई: ठाकरे सरकारमधील १६ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाचा बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहे. फडणवीस यांच्यानंतर अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह आले होते, मात्र त्यांनी कोरोनावर मात केली आहे.