‘दया कुछ तो गडबड हैं’: अजित पवार-फडणवीस ट्रोल

0

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती, दरम्यान आज सोमवारी अजित पवारांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे. अजित पवारांनी आज त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार होणार आहे. अजित पवार-फडणवीस यांना एक दिवसाआड कोरोनाची लागण होणे केवळ योगायोग आहे. मात्र दोघेही सोशल मीडियात ट्रोल होत आहेत.

फडणवीस आणि अजित पवारांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अजित पवार हे महाविकास आघाडीत असले तरी त्यांची भाजपाबाबतच्या भूमिकेबद्दल नेहमीच चर्चा होत असते. दोघांना एकाच वेळी कोरोनाची लागण कशी झाली?, ‘दया कुछ तो गडबड है’, दोघेही सोबत आले, त्यामुळेच दोघांना कोरोना झाला अशा मिश्कील आशयाची पोस्ट सोशल मीडियात फिरू लागली आहे.