जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव – तक्रारदाराने दंडाच्या रकमेचा भरणा केल्यानंतरही त्याचा अहवाल देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागणार्‍या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) रंगेहाथ अटक केली आहे.

जवखेडा येथील 38 वर्षीय तक्रारदार यांची जवखेडा येथे शैक्षणिक संस्था असून, ती शेत जमिनीवर बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना तहसीलदारांनी दंडाची नोटीस बजावली होती. तक्रारदाराने 32 हजार 426 रुपये दंड भरला आणि दंड भरल्याचा रिपोर्ट तलाठ्याकडे मागितला होता. मात्र, त्या मोबदल्यात जवखेडा (ता. अमळनेर) येथील आरोपी तलाठीने 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. बुधवारी दुपारी 12.30 वाजता लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तलाठ्याला अटक केली. मुकेश सुरेश देसले (44, रा. प्लॉट नं.54, सूर्या नगर, नकाणेे रोड, आधार नगरजवळ, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

Copy