खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

भुसावळ |
येथील मॉर्डन रोडवरील गोपी शॉपिंग मॉलचे मालक रविकुमार गोपीचंद झामनानी यांना दोन अनोळखी इसमांनी दुपारी पहिल्या मजल्यावरील काउंटरवर येऊन वीस हजार रुपयांची मागणी करून धमकी देऊन दुकानांचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मॉर्डन रोडवरील गोपी शॉपिंग मॉलचे मालक रविकुमार गोपीचंद झामनानी हे नेहमी प्रमाणे सकाळी दुकान उघडून काउंटर वर हजर असतांना (ता. १६) रोजी दुपारी १.४० वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम तोंडात रुमाल बांधलेले गोपी शॉपिंग मॉलच्या पहिल्या मजल्यावरील काउंटरवर येऊन मालकास वीस हजार रुपयांची मागणी करून धमकी द3ऊन पैसे न दिल्यास दुकानांची तोडफोड करून नुकसान करून “तू भी यहा पे नही रहेंगा” अशी धमकी दिली म्हणून दोघे अनोळखी इसमांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.