सीईटीसाठी अर्जाची अवधी 23 मार्चपर्यंत

0

धुळे । तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचेमार्फत एमएचटी-सीईटी 2017 ही परीक्षा धुळे जिल्ह्यात गुरुवार 11 मे 2017 रोजी होणार आहे.

सदर परीक्षा ही अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी धुळे जिल्हयात साधारणपणे 7000 ते 8000 विद्यार्थी परीक्षा देतील. या परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म हीींिं://ुुु. वींशारहरीरीहीींर. र्सेीं. ळप/ाहींलशीं2017 या संकेतस्थळावर 14 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत भरावा असे जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे व जिल्हा संपर्क अधिकारी, के.आर.पवार, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार कळविले आहे.