90 टक्के मुले पोषण अभावयुक्त

0

मुंबई । तुम्ही नेहमी म्हणता आजपर्यंत आमचे मूल उपाशीपोटी कधीच झोपलेले नाही, तरीही तुम्ही म्हणता, तुमचे मूल कुपोषित आहे? आश्चर्य वाटेल, पण बर्‍याच अंशी हे खरे आहे. यासंदर्भात कम्युनिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (सीआयएमएस) या संस्थेने एक सर्वेक्षण केले. त्यांचा अभ्यास सांगतो,

भारतातील जवळपास 90 टक्के मुले पोषणअभावयुक्त असू शकतात. मुलांना पोषणयुक्त आहारच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात अनेक पोषणमुल्यांचा अभाव आहे. नमुन्यादाखल त्यांनी काही शाळकरी मुलांचा अभ्यास केला आणि त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.