देशात आतापर्यंत ९ कोटी कोरोना टेस्ट

0

नवी दिल्ली: कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. दररोज ६० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतातील रिकव्हरी रेट देखील मोठा आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ७३ लाखांच्या पुढे गेली आहे. ७३ लाख ७० हजार ४६९ झाली आहे. बाधितांची संख्या मोठी असली तरी रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ६४ लाख ५३ हजार ७८० बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८ लाख ०४ हजार ५२८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत १ लाख १२ हजार १६१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ६३ हजार ३७१ बाधितांची नोंद झाली आहे. ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान भारतातील कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. दररोज दहा लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असतात. ९ कोटींपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत भारतात ९ कोटी २२ लाख ५४ हजार ९२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ७३ लाख ७० हजार ४६९ इतके बाधित आहेत.

मागील दोन आठवड्यापासून रुग्ण संख्या घटली आहे. मात्र त्यातही चढ-उतार आहे.