शेतीसाठी यांत्रिकीकरण वापरा

0

जळगाव । शेतात कष्ट शेतकर्‍याला कमी वेळात शेतीत काम करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करुन आपले शेतीमाल उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज येथील ममुराबाद कृषी फार्म येथे केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद जळगाव, कृषी विभाग जळगाव व आत्मा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसर्‍या कृषी यांत्रिकीकरण दिवस व सुधारीत कृषि अवजारांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. मंचावर कृषीभूषण विश्वासराव पाटील महाराष्ट्र राज्य कृषी अवजारे उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बागुल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिंदे, तेलबिया संशोधन केंद्र जळगावचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुदाम पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी आत्माचे उपसंचालक अनिल गवळी उपस्थित होते.

बेरोजगारांनी पुढे येण्याचे केले आवाहन

जिल्हाधिकारी म्हणाल्या, गरज ही शोधाची जननी आहे. शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतात काम करतांना येणार्‍या अडचणीतून निर्माण होणार्‍या गरजेतून ते नव नवीन उपक्रम हाती घेतात.त्यातून नवीन यंत्र व अवजारे शोधून काढतात त्यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग करावा. शेतकर्‍यांची आंतरमशागतीची कामे करु शकतात याद्वारे अल्पभूधारक शेतकर्‍यांचे देखील यांत्रिकीकरण होईल, त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी तरुणांनी पुढे यावे.

मान्यवरांनी केले शेतकर्‍यांना मार्गदर्शन

डॉ. किरण कोकाटे म्हणाले, शेतीतील कष्ट कमी करुन शेती आनंददायी कशी होईल हेच यांत्रिकीकरणाचा मुख्य हेतू असून शेतीतील उत्पादकता वाढविणे काटेकोर पद्धतीने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा. कृषीभूषण विश्वास पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे प्राध्यपक व प्रमुख संशोधक प्रा. तुळशिदास बास्टेवाड महाराष्ट्र कृषी अवजारे उत्पादक संघटना धुळे अध्यक्ष प्रकाश बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यांनी घेतले परीश्रम

प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश तुरबतकर यांनी केले. यावेळी कृषी विभागाने तयार केलेल्या हरभरा विषयक घडी पुस्तिका व नविन संशोधक शेतकरी स्मरणिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी महिला बचतगट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांनी केले.