गरूड विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

0

शेंदुर्णी । आचार्य ग.र.गरूड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. यावेळी इ. 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश विद्यालयाचे आरोग्य विभागाचे प्रमुख व नीडल शिक्षक कपिल देशमुख यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विद्यालयाचे उपशिक्षक डी.बी. पाटील यांनी जंतनाशक गोळ्याचे फायदे व त्याचा आरोग्यावर होणारे परिणाम विद्यार्थ्यांना सांगितले व मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांची मनातील घालविली भीती

जंतापासून बचावासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या यामध्ये नखे स्वच्छ ठेवा व नियमित कापा, नेहमी स्वच्छ पाणी प्या, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा, स्वच्छ पाण्याने फळे व भाज्या धुवा, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा, पायात बुट, चप्पल नेहमी घाला, उघड्यावर शौचास बसू नये, आपले हात साबणाने धुवा आदि महत्वपूर्ण गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांच्या मनातील भिती घालवण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी. मांडवडे यांनी व इतर शिक्षकांनी आधी स्वत: गोळी घेतली अशा प्रकारे कार्यक्रम साजरा केला. या प्रसंगी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.