असिस्टंट कमांन्डटपदी अजय पवार

0

भडगाव । अजय पवार यांची असिस्टंट कमांन्डटपदी निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सेंट्रल आर्मड फोर्सेसच्या असिस्टंट कमांडंटसाठी 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अजय पवार याने भारतातून 52 व्या रँकने उल्लेखनीय यश मिळविलेले आहे. त्यांनी बी.ई. कॉम्प्युटर, एम.बी.ए.चे शिक्षण घेतले आहे. तसेच नुकतीच युपीएसीची सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षाही दिलेली आहे. भडगाव शहरातील एच कॉलनीचे रहिवासी असलेले. अरूण पवार, माजी प्राचार्य व विजया पवार उपशिक्षिका यांचे पुत्र असून त्यांचे शिक्षण लाडकूबाई विद्यामंदिर भडगाव येथून केलेले आहे. त्यांच्या यशाबद्दल किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, नगराध्यक्ष शामकांत भोसले यांनी कौतुक केले आहे.